धावत्‍या कंटेनरने घेतला अचानक पेट; संगणकासह ७० लाखाचे नुकसान

फुले शाहू आंबेडकर
0
चाळीसगाव - धुळे महामार्गावर रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हैद्राबाद येथून सुरतला  संगणक घेऊन जाणाऱ्या कंटेनरने खडकी फाटा (ता.चाळीसगाव) येथे अचानक पेट घेतला. यात सुमारे ७० लाखाचे नुकसान झाले आहे. तर कंटेनर देखील जळुन खाक झाला आहे. या घटनेची माहिती मेहुनबारे पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळी घेऊन पंचनामा केला
चाळीसगाव धुळे महामार्गावरील खडकी फाट्यावर हैद्राबादहुन सुरतकडे संगणक घेऊन जाणाऱ्या कंटनेरने अचानक पेट घेतला. कंटेनरने पेट घेतल्याचे त्याच्या मागे चालणाऱ्या वाहन धारकांच्या लक्षात येताच सदरील बाब कंटनेर चालकाला सांगितली. तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर आगीने रौद्र रूप धारण केले.

आग विझविण्यासाठी प्रयत्‍न

चालकाने आग विझविण्यासाठी कंटेनर रस्‍त्याच्या कडेला पलटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही उपयोग झाला नाही. या घटनेची  माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड व उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांनी घटनास्थळी पोलिस कर्मचारी पाठवले व सर्व माहिती घेऊन पंचनामा केला. कंटेनरमध्ये असलेले संगणक व कंटेनरसह सत्तर लाखांचे नुकसान झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default