जिल्ह्यातील अवैध गर्भपात प्रकरणात आता आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. हा दवाखाना आरोग्य यंत्रणा तसेच पोलीस प्रशासनाने सील करून त्या ठिकाणचे संपूर्ण साहित्य जप्त केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली.
दवाखाना चालवण्याचा परवानाही नाही
धक्कादायक बाब म्हणजे त्या दांपत्याकडे ग्रामपंचायतीचा दवाखाना चालवण्याचा परवाना नसल्याचे देखील उघडकीस आले आहे. तसेच महिला डॉक्टरांकडे ‘बीएचएमएस’ची पदवी होती. मात्र, पुरुष डॉक्टराकडे कोणत्याही प्रकारची पदवी नसल्याचेही समोर आले आहे. या दवाखान्याला गर्भपाताची कोणत्याही प्रकारची शासन मान्यता नसल्याचा धक्कादायक खुलासा देखील समोर आला आहे.
