साठा पथकाने जप्त केला असून, त्याची किंमत अंदाजे ५० लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी आर.एम. भरकड आणि उपायुक्त कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.आमदार एकनाथ खडसे यांनी आजच विधानपरिषदेत मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत विधानपरिषदेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. यात त्यांनी प्रामुख्याने मध्य प्रदेशातून गुटखा मोठ्या प्रमाणात मुक्ताईनगर तालुक्यासह जिल्ह्यात येत असून,यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा आरोप केला होता. यानंतर काही तासांमध्येच ही कारवाई करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने कारवाईचा तपशील अद्याप समजला नाही
खडसेदरम्यान, या संदर्भात आमदार खडसे यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, आज मुक्ताईनगरात मोठी कारवाई झाली असली तरी हे तर फक्त हिमनगाचे टोक आहे.मुक्ताईनगरसह जिल्ह्यात राजकीय वरदहस्ताने गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून, याचबाबत मी आज विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. यानंतर मी या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांशी बोललो. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी हा एका बड्या पुढाऱ्याचा जवळचा व्यक्ती असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
