याबाबत पाड्यावर हणार्या पीडितेच्या आईने शिरपूर तालुका पोलिसांना फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांची मुलगी शेतात पाणी भरण्यासाठी व गायीला चारा कापायला गेली असता तेथे मुलीचा काका बाट्या चतुरसिंग पावरा (वय ४०) हा आला. त्याने तिला धमकी देवून तिच्यावर कपाशीच्या शेतात अत्याचार केला.
चार महिन्यांपूर्वी ही घटना घडली. त्यामुळे पिडीतेला दिवस राहिले, त्यात तिचे पोट पुढे आल्याने तिच्या आईला शंका आली. त्यांनी मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता हकीकत सांगितली. काकानेच अत्याचार केल्याचे सांगितल्याबरोबर कुटुंबियांना मोठा धक्का बसला. पीडितेच्या आईने बाट्या पावराविरुद्ध काल पोलिसात फिर्याद दिली.
