धक्कादायक! प्रियकराच्या मदतीने आईने अल्पवयीन मुलीची विक्री केल्याचा आरोप? अत्याचारानंतर मुलगी सात महिन्यांची गर्भवती

फुले शाहू आंबेडकर
0

अहमदनगर: जिल्ह्यातील श्रीरामपूर पुन्हा एकदा लव जिहादच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहे. चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीची विक्री करून धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला.

मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. प्रियकराच्या मदतीने आईनेच या मुलीची विक्री केल्याचा आरोप होत आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना गजाआड करण्यात आलंय

श्रीरामपूर तालुक्यातील एका चौदा वर्षीय मुलीची विक्री करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही मुलगी आठ महिन्यांची गर्भवती झाली आहे. आठ वर्षापुर्वी मुलीच्या आईला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नवाब लालाभाई शेख नावाच्या व्यक्तीने त्याचे अगोदर लग्न झालेले असतानाही बेकायदेशीर संसार थाटला.

पीडित मुलीच्या आईने आणि नवाब शेख यांनी या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विक्री केल्याचा आरोप मुलीच्या वडीलांनी केला आहे. नवाब शेख आणि मुलीवर अत्याचार करणारा नजिम पठाण याला पोलीसांनी जेरबंद केलं आहे. मुलीची आई देखील यात आरोपी असून पोलीस तिचाही शोध घेत आहेत.

मुलगी अगदी बारा तेरा वर्षाची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. श्रीरामपूरमधील ही एकमेव घटना नाही. या अगोदरही अशा घटना घडल्या असून सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. हा सगळा लव जिहादचा प्रकार असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. श्रीरामपूर शहरात असं मोठं रॅकेट कार्यरत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default