मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आरोपी नागेश याने फिर्यादी तरुणीशी ओळख केली आणि तिच्यावर आपले प्रेम आहे असे भासवून तिचा विश्वास संपादन केला. यानंतर त्याने त्या तरुणीला पुणे सातारा रस्त्यावर असलेल्या एका लॉजमध्ये नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शरारिक संबंध ठेवले आणि ब्लॅकमेल करत फोटो, व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देखील दिली.
त्यानंतर आरोपीने पीडित तरुणी शिकत असलेल्या कॉलेजच्या बाहेर जाऊन तिच्याशी भेटून तिला लग्नाची मागणी करू लागला. तरुणीने लग्नास दिल्यानंतर त्याने "मी फिनेल पिऊन जीव देईल" अशी धमकी दिली आणि तरुणीला जबरदस्तीने सोलापूर येथे नेऊन तिच्याशी लग्न केले.तरुणी कारण देऊन पुन्हा वडिलांच्या घरी राहायला आली असता पुन्हा आरोपीने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या सगळ्या जाचाला कंटाळून अखेर त्या तरुणीने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांकडून या आरोपीचा शोध घेतला जात आहे
