दीड कोटी रूपयांचा गुटखा पकडला-आ.एकनाथराव खडसे

फुले शाहू आंबेडकर
0
तालुका गुटखा आणि गांजा तस्करीचे मोठे केंद्र बनल्याचा आरोप!
मुक्ताईनगर तालुक्याला लागून मध्यप्रदेशची सीमा असून तेथून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आणि अंमली पदार्थ या तालुक्यातून जिल्हाभरात येत असल्याचा आरोप आ.एकनाथराव खडसे करत आहेत. पोलिसांनी यावर अनेकदा कारवाई केली असली तरी देखील हा धंदा दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार एकनाथराव खडसे यांनी याच विषयावर विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला होता.
आज मुक्ताईनगर शहरात गुटख्याने भरलेला ट्रक पकडण्यात आला आहे. या ट्रकमध्ये पूर्णपणे गुटखा भरलेला होता, त्याची mrp किंमत ५६ असून बाजारभाव तब्बल एक कोटी रूपये असल्याची माहिती आ.एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. हा ट्रक मुक्ताईनगर पोलीस स्थानकात जमा करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच आ.खडसेंनी त्याठिकाणी जाऊन माहिती घेत कारवाई करणाऱ्यांचेही अभिनंदन केले.
त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्या एक महिन्यातच दीड कोटी रूपयांचा गुटखा पकडण्यात आला असून मुक्ताईनगर तालुका गुटखा आणि गांजा तस्करीचे मोठे केंद्र बनले असल्याचा आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला. आज अन्न व औषध प्रशासनाने गुटख्याचा मोठा साठा जप्त केल्यानंतर त्यांनी प्रशासनावर जोरदार टिका करत गंभीर आरोप केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default