मालपूर परिसरात पावसाची हजेरी; शेतकऱ्यांची तारांबळ

फुले शाहू आंबेडकर
0
दोंडाईचा : मालपूर (ता. शिंदखेडा) भागात सोमवारी  सायंकाळी आठच्या सुमारास अवकाळी पावसाने  हजेरी लावली.
सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. तयार झालेले गहू, हरभरा, मका पिकाचे पावसामुळे नुकसान झाले. आठवडाभरात तिसऱ्यांदा रब्बी पिकांना फटका बसला आहे.त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळपासून विजांचा लखलखाट सुरू झाला. सायंकाळच्या सुमारास जवळपास वीस मिनिटे पावसाने हजेरी लावली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default