बालविवाहातून कन्यारत्नाची प्राप्ती शिरपूर येथील घटना; गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0

एका अल्पवयीन मुलीचा विवाह तिचे आईवडील व इतर नातेवाइकांनी लावून दिल्यानंतर ती गर्भवती झाली. तिने कन्येला जन्म दिला. मात्र, बालविवाह करणे हे बेकायदेशीर असल्याचे माहीत असूनही लग्न लावून दिल्याप्रकरणी तिच्या पालकांसह पती व अन्य नातेवाइकांविरोधात शिरपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

शिरपूर तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या पीडित अल्पवयीन विवाहितेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार तिची आई, वडील, पती, सासू आणि अन्य नातेवाईक यांनी संगनमत करून धुळे तालुक्यात एका गावातील तरुणासोबत विवाह लावून देण्यात आला होता. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शिरपूर येथे तिने कन्यारत्नाला जन्म दिला.

हा बालविवाह असल्याचे समोर आल्यानंतर पीडित मुलीने शिरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, संशयितांविरोधात भादंवि कलम ३७६ सह बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११, १२ सह पोस्को अधिनियम ४, १७, प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास धुळे तालुका पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default