अमळनेर येथे बनावट नोटा बाळगणा-या दोघांविरुद्ध गुन्हा

फुले शाहू आंबेडकर
0

जळगाव : बनावट नोटा ख-या असल्याचे भासवून त्या वितरीत करणा-या दोघांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलासभाई शिवरामभाई भोया रा. इहदरी ता. कफराडा जिल्हा वलसाड – गुजरात आणि वसंत कालसिंग मुलकाशा रा. कावडाझिरी जिल्हा अमरावती अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

अमळनेर शहरातील पैलाड भागात 24 मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता हा प्रकार उघड झाला. दोघांकडून दहा हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा, दोन मोबाईल आणि एक मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हे.कॉ. सुनिल हटकर यांनी दिलेल्याफिर्यादीनुसार अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप निरीक्षक अनिल भुसारे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default