गर्दीत काही युवक हम ब्लेड ग्रुपके लडके है, किसीको भी मारंगे असे म्हणत गोंधळ घालत असल्याने जाकीर अली यांनी त्यांना उपास सोडण्याची वेळ असून वातावरण खराब करु नका, अशी विनंती केली. त्यावर संशयित आदिल शेख याने त्याच्या हातात असलेल्या प्लॉस्टरच्या बँडेजमधून चाकू बाहेर काढला व जाकिर अली यांचा मुलगा मुझाहिद सैय्यद याच्या उजव्या बरगडीवर, हातावर वार केला. त्याचवेळी इतरांनीही लाकडी दांड्याने व दगडफेक करुन मारहाण केली.
या घटनेत फराज मसुद शेख, साहिल ऐजाज शाह, मुझाहिद सैय्यद हे तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येेथे दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. परंतू मोठा फौजफाटा तैनात केल्यानंतर तणाव निवळला.
यांच्यावर गुन्हा दाखल
जाकिर अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित आदिल अल्लाद्दीन शेख, लंगडे का बाबू तथा इम्रान शेख, जादू तथा फैैजान याकूब शेख, यामीन इरफान मिर्झा, जमील बुढा, फरान सैफूद्दीन मुल्ला, रिजवान सैफूद्दीन मुल्ला, दानिश तथा आबा मिर्झा, जुनैद इकबाल मिर्झा, समीर तथा बबलू सईद शेख व त्यांचे अन्य चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
