निमडाळेत सव्वाकोटीचा गुटखा जप्त

फुले शाहू आंबेडकर
0
सहाय्यक पोलीस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांची कारवाई, सात जणांना अटक
धुळे तालुक्यातील निमडाळे शिवारात सहाय्यक पोलीस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांच्यासह पथकाने गुटख्याची  तस्करी रोखली. सापळा लावून दोन ट्रक पकडण्यात आले. त्यातून सव्वा कोटींचा गुटखा जप्त  करण्यात आला तसेच सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज मध्य रात्री 12.30 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन हद्दीतील निमडाळे गाव शिवारातून धुळे शहरात महाराष्ट्रात प्रतिबंधित विमल पानमसाला गुटखा माल विक्री करण्याच्या उद्देशाने दोन आयशर (क्रं. एम. एच 04/एफ जे 3048 व क्रं एम. एच 04 / एच. डी. 7350) या येणार असल्याबाबत गोपनीय बातमी धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या सह पथकाने निमडाळे गाव शिवारात सापळा रात्री 12.30 वाजेच्या सुमारास वरील क्रमांकाच्या दोन्ही आयशर वाहन आल्याने त्यांना थांबवून त्यांची तपासणी केली. त्यात एकुण एक कोटी 23 लाख रुपये किंमतीचा विमल पानमसाला गुटखा, सुगंधित तंबाखुचा माल मिळून आला. तसेच सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागांकडून सविस्तर पंचनामा करण्यात आला. पश्चिम देवपुर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक एस. ऋषीकेश रेड्डी, पोसई दत्तात्रय उजे, हे.कॉ. कबीर शेख, चंद्रकांत जोशी, रमेश उघडे, मंगा शेमले, पो.कॉ. प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, कर्नलबापु चौरे  शरद पाटील यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default