विहिरीत टाकण्याची धमकी देत काकाचा पुतणीवर अत्‍याचार; गर्भवती राहिल्‍याने प्रकार आला समोर

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर : काकाने केलेल्या अत्याचारामुळे पुतणी गर्भवती झाल्याची घटना भोईटी येथे घडली. संशयिताविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला.
भोईटी परिसरातील एका पाड्यावर पीडित १४ वर्षीय मुलगी कुटुंबासह राहते. सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी शेताच्या शेजारी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता संशयित बाठ्या चत्तरसिंह पावरा याने तिला पकडले. तिला विहिरीत ढकलून देण्याची धमकी देऊन कपाशीच्या शेतात ओढून नेत अत्याचार  केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास ठार करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिता गप्प राहिली.

आईला संशय आल्‍याने समोर आली बाब

दीड ते दोन महिन्यांनी ती शेतात गायीसाठी चारा कापत असताना संशयित पुन्हा तेथे गेला. ती एकटी असल्याची संधी साधून त्याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, १४ मार्चला पीडिता आईला मदत करण्यासाठी गेली असता तिच्या पोटाकडे पाहून आईला संशय आला. तिने खोदून विचारल्यावर अत्याचाराबाबत पीडितेने माहिती दिली. तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित बाठ्या चत्तरसिंह पावरा याच्याविरोधात  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default