जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीवरून पुन्हा एकाद मुंडे बहिण भाऊ आमने-सामने आले आहेत. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधताना गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या या एज्युकेशन सोसायटीवर धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीत पॅनल उभा करत पंकजा मुंडे यांना कडवं आव्हान दिलं आहे
यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्या जर बिनविरोध निवडूण आल्या नसत्या तर त्यांचा सर्व पॅनल पराभूत झाला असता, अशी टीका धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे. तसेच मागच्या लोकांनी कोणाच्या खात्यावर किती पैसे टाकले याबद्दलचे सर्व पुरावे माझ्याकडे असून, ते मी देऊ शकतो असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
