आधी बायकोचा खून, मग स्वतःचं आयुष्य संपवलं, मामाच्या गावी गेलेल्या लेकरांवर आभाळ

फुले शाहू आंबेडकर
1
पतीने पत्नीची दगडाने मारहाण करीत गळा दाबून हत्या केली. त्यानंतर रक्ताने माखलेले हात स्वच्छून धुवून स्वतः विष प्राशन करत आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.
वर्धा : भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये पत्नीला दगडाने मारहाण करीत तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पतीनेही विष पिऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना वर्धा जिल्ह्यातील आंजी (मोठी) येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये उघडकीस आली. या प्रकरणी खरांगणा (मोरांगणा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंदन ज्ञानेश्वर कांबळे (वय ४५) व शीतल कुंदन कांबळे (वय ४०, रा. धुळवा) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.
कांबळे दाम्पत्य काही वर्षांपासून आंजी (मोठी) येथे वॉर्ड क्रमांक ४ मध्ये भाड्याने राहत होते. सायंकाळपर्यंत त्यांच्या घराचे दार उघडले नसल्यामुळे शेजाऱ्यांनी याबाबत कुंदनच्या भावाला कळविले. भावाने लगेच धाव घेत आंजीच्या पोलिस चौकीत माहिती दिली असता पोलिसांनी रात्री आठ वाजता घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मोठ्या परिश्रमाने घराचे दार उघडल्यावर घरात बघितले असता पती-पत्नी मृतावस्थेत आढळून आले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात पती कुंदन याने पत्नी शीतलची दगडाने मारहाण करीत गळा दाबून हत्या केली. त्यानंतर रक्ताने माखलेले हात स्वच्छून धुवून स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. यावेळी ठसे तज्ज्ञांसह प्रयोगशाळा तज्ज्ञांचाही चमू दाखल झाला होता. या प्रकरणी खरांगणा (मोरांगणा)
 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या दाम्पत्याला १३ वर्षांची मुलगी मैत्री व नऊ वर्षांचा मुलगा सम्राट. मैत्री आणि सम्राट हे दोघेही भाऊ-बहीण चार-पाच दिवसांपूर्वी धामणगाव (वाठोडा ) येथे आपल्या मामाच्या गावी गेले होते. त्यामुळे घरात पती-पत्नी हे दोघेच होते. वडिलांनी आईची हत्या करून स्वतः ही जीवनयात्रा संपविल्याने आता दोन्ही चिमुकले आई-वडिलांअभावी पोरकी झाले आहेत. आता त्यांच्यावर मोठे संकट कोसळले असून त्यांनी टाहो फोडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default