राजु सुदाम कोळी (वय 32 रा. वाल्मिक नगर, शिरपूर) असे मयत तरूणाचे नाव आहे. त्यास दारुच्या पैशाच्या उधारीतून व मागील भांडणाच्या रागातून दि. 23 एप्रिल रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास किस्मतनगर येथील सुंदरवाड़ी रोडावर योगेश कोळी, बंटी कोळी, दीपक कोळी, छोटु कोळी यांनी शिवीगाळ करीत त्यास डोक्यावर, पाठीवर, पोटावर, तोंडावर हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली.
त्यानंतर राजु कोळी यास घरी आणले तेव्हा त्याच्या कानातून रक्तश्राव होत होता. सायंकाळी राजुला त्याचा भाऊ जेवणासाठी उठवायला गेला असता तो उठला नाही. त्यास शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले.
याबाबत मयताचा भाऊ राकेश सुदाम कोळी याने शिरपूर शहर पोलीस दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
