जिल्‍हाधिकारींना भेटण्यासाठी पायरीवरच झोपली; मानसिक रुग्ण वृद्धेचा जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ

फुले शाहू आंबेडकर
0
मानसिक रुग्ण असलेल्या वृद्ध महिलेने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातला. जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मानसिक रुग्ण असलेल्या वृद्ध महिलेने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर झोपून जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा हट्ट केला 
आठवड्यातील पहिला दिवस असल्‍याने धुळे जिल्‍हाधिकारी कार्यालयात कामानिमित्‍त येणाऱ्या नागरीकांची वरदळ सुरू होती. याच गर्दीत एक वृद्ध महिला देखील जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या आवारात आली. तिने काही वेळातच गोंधळ घालायला सुरवात केली. जिल्‍हाधिकारी यांना भेटायचे असे म्‍हणत ती कार्यालयात जाण्याच्‍या पायरीवर झोपली. मानसिक रुग्ण असलेल्या या वृद्ध महिलेच्या हट्टीपणामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.
पोलिसांनी घेतले ताब्‍यात

या संदर्भातील माहिती धुळे शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत गोंधळ घालणाऱ्या या मानसिक रुग्ण असलेल्या वृद्ध महिलेस ताब्यात घेतले आहे. या सर्व प्रकारामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default