मला तुझी बायको खूप आवडते, तरुणाचा थेट साडूला फोन; मेहुणीसोबत केलं संतापजनक कृत्य

फुले शाहू आंबेडकर
0
जालना जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका विवाहित तरुणाने आपल्याच लहान मेहुणीवर अत्याचार केले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारांचं प्रमाण वाढलं आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात तातडीने कठोर पाऊलं उचलण्याची मागणी केली जातेय. अशातच जालना जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका विवाहित तरुणाने आपल्याच लहान मेहुणीवर अत्याचार केले
वासनाधिन तरुणाने विवाहित मेहुणीच्या शरीराचे वारंवार लचके तोडले. हा तरुण इतक्यावरच थांबला नाही, तर याची वाच्यता केल्यास तुझी आई, भाऊ, बहिणीला जीवे मारून टाकेल, अशा धमक्याही दिल्या. अखेर सहनशिलतेचा अंत झाल्याने मेहुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल होताच अत्याचार करणाऱ्या तरुणाला जालन्याच्या पिंक मोबाइल पथकाने अटक केली. त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत म्हणजे २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
बलराम जयसिंग शिंगने (वय ३० वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या नराधम तरुणाचे नाव आहे. तो शहरातील  रोहणवाडी परिसरात राहतो. प्राप्त माहितीनुसार, शहरातील हनुमानघाट परिसरातील १९ वर्षीय तरुणीचे देऊळगावराजा तालुक्यातील एका तरुणासोबत लग्न झाले आहे.
लग्नानंतर त्या तरुणीच्या पतीला त्याच्या साडूने म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीचा नवरा बलराम शिंगने याने फोन केला. मला तुझी बायको खूपच आवडते. तू तिला सोडून दे, असे म्हणत बलरामने त्याच्या साडूला शिवीगाळ केली.
या घटनेमुळे नवरा बायकोत वाद होऊ लागले. पतीसोबत वाद होत असल्याने १९ वर्षीय विवाहिता अखेर तिच्या माहेरी आली. ही संधी साधत ३० डिसेंबर २०२२ ला मेहुणीला आधार कार्ड दुरुस्त करून देण्याचा बहाणा करत बलराम शिंगने हा रोहणवाडी येथे घेऊन गेला.

त्यानंतर मेहुणा बलराम याने विवाहित मेहुणीवर रोहणवाडी येथे एका मित्राच्या घरी नेऊन शारीरिक अत्याचार केला. बलराम हा इतका वासनाधिन झाला होता की, त्याला वाटेल तेव्हा तो मेहुणीवर शारिरीक अत्याचार करत होता.

याची वाच्यता कुणाजवळ केल्यास तो तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा देत होता. अखेर मोठ्या भाऊजीकडून होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून मेहुणीने पोलिसांत धाव घेतली. घडलेली सर्व हकीकत तिने पोलिसांजवळ कथन केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी  तातडीने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default