दहीगावात फलकाची विटंबना : पोलिसांच्या दक्षतेने शांतता

फुले शाहू आंबेडकर
0
तालुक्यातील दहिगाव येथील गावातील मुख्य चौकातील फलकाची  विटंबना केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली असुन गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.
घटनेची खबर मिळताच फैजपूर उपविभागीय पोलीस अधिक उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचत शांततेचे आव्हान केले आहे. दरम्यान गावातील वातावरण शांत असून सर्व शेतीचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत. पोलीस बंदोबस्त तैनात असून उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे राकेश मानगावकर ,पोलीस अधिकारी व ताफ्यासह तळ ठोकून आहेत.
तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील प्रतिमेची शनिवारी रात्री दहा वाजेवाजेचे सुमारास अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली. रविवारी सकाळी घटनेचे वृत्त गावात कळताच, मोठ्या संख्येने जमाव मुख्य चौकात जमून सुमारे तीन तास पोलीस चौकी समोर ठिय्या आंदोलन दिले. पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने थोर पुरुषाच्या प्रतिमेचे शुद्धीकरण केले
  या प्रसंगी सरपंच अजय अडकमोल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांचे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून चोपडा आणि विविध ठिकाणावर गंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलीस अधिकारी पोलिस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, पोलीस उपनिरिक्षक सुनील मोरे, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांचे सह पोलीसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान फलक विटंबना प्रकरणी पोलिसांनी पाच संशयीतांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी पत्रकारांना दिली. दहिगाव गावात विटंबनानंतर तणावपूर्ण वातावरण असल्याने यावल दहिगाव सावखेडा बस सेवा सकाळ पासून बंद करण्यात आली आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default