धुळ्यात मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांनी गर्दी पांगवण्याठी केला लाठीचार्ज

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदान सुरु असताना मतदान केंद्राबाहेर  कार्यकर्त्यांचा राडा झाला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. सध्या मतदान केंद्राबाहेर गोंधळाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानादरम्यान राडा झाला आहे. मतदान केंद्राबाहेर भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे 
मतदान केंद्राबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे
भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी करत राडा घातला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत राडा घातला. मतदान केंद्राबाहेर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी सुरुवातीला या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
पण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जास्तच आक्रमक झाल्याचे लक्षात येता सकाळपासून सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांनी कार्यकर्त्यांची ही गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. पोलिसांनी भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्यामुळे मतदान केंद्राबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशामध्ये सध्या पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या शांततेत मतदान सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default