सिन्नर परिसरात वास्तव्य करणाऱ्या प्रियकराने प्रेयसीच्या मुलाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.
खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी बालक मृत झाल्याचे सांगितले. त्यावेळी गणेशने लघु शंकेचे निमित्त करत तिथून पळ काढला. दरम्यान डॉक्टरांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. आई काजल हिने घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलीस निरीक्षक शामराव निकम यांनी संशयित आरोपीला पकडण्यासाठी बोकडदरा येथील पोलीस पाटील आणि सरपंचांशी संपर्क साधला. त्यानंतर गणेशलाचौकशीसाठी ताब्यात घेतले.
दरम्यान गणेशची नातेवाईक असलेल्या महिलेने त्याच्या वडिलांना फोन करत ठिकाण विचारले. त्यावरुन पोलिसांना गणेश मोहाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी इथे धाव घेत गणेशला ताब्यात घेतले. बालकाची आई काजलने दिलेल्या फिर्यादीवरुन अमोल माळी याला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत गणेशला बेड्या ठोकल्या आहे.
24 तासांत अटक
दरम्यान सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सिन्नर ग्रामीण रुग्णालय गाठले. बालकांच्या आईकडून सर्व परिस्थिती जाणून घेत तपासाची चक्रे फिरवली. त्यानुसार निफाड तालुक्यातील बोकडदारा येथील सरपंच यांच्याशी संपर्क साधला. त्याचबरोबर गणेशच्या आई-वडिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गणेशचा पत्ता मिळाला. त्यानुसार पोलिसांनी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील जाऊन गणेश माळी याच्या मुसक्या आवळल्या. मात्र या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अशा पद्धतीने क्रूर होऊन कोवळ्या जीवाचा जीव घेतल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
