शीतल शांताराम भिल वय 17 वर्ष रा.सोनखेडी ता.अमळनेर ही 15 रोजी रात्री घरात झोपलेली होती.मात्र रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास तिच्या आईला ती दिसून आली नाही.तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्यामुळे अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवून पळवून नेले आहे.शांताराम दशरथ भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.
तर शहरातील खाजा नगर भागातील बंगाली फाईल येथील नाजीया उर्फ अनु शेख अहमद वय 15 ही 17 रोजी सकाळी साडे तीन वाजता बाथरूमला जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर निघाली मात्र बऱ्याच वेळानंतर परत न आल्याने तिला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असून मुन्नी शेख रहीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिलदेव पाटील करीत आहेत.
