पिंपळनेरसह परिसरात आजही बेमोसमी पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकर्यांसह व्यापार्यांची एकच धावपळ उडाली. कांदा मार्केटमध्येही शेतकर्यांची धावपळ दिसून आली. पिंपळनेर शहरात अर्धा ते पाऊण तास चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्यांची सध्या चालू असलेली कांद्याची काढणी, गहू, मका व उन्हाळी बाजरी पीक शेतात असल्याने या पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
बल्हाणे, शेवगे परिसरात वीस मिनिटे गारपीटकांदा, भाजीपाला, मका पिकांचे नुकसान, पिंपळनेरसह परिसरात पाऊस
रविवार, एप्रिल १६, २०२३
0
पिंपळनेरसह परिसरात आज पाऊण तास पाऊस झाला. तर बल्हाणे, शेवगे परिसरात 25 मिनिटे गारपीट झाली. त्यामुळे कांदा, मका, गहू पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
Tags
