शिंदखेड्यात 50 वर्षानंतर रंगली बैलगाडा शर्यत; 31 स्पर्धकांचा सहभाग

फुले शाहू आंबेडकर
0
येथील विरदेल रस्त्यालगतच्या शेतात झालेल्या राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत राज्यातील ३१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. शिंदखेडा येथे पन्नास वर्षांनंतर प्रथमच राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत झाली. तीत तालुक्यातील गोराणे येथील गणेश पाटील यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला.
बैलगाडा शर्यतीचे उद्‌घाटन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा उपसंघटक भाईदास पाटील, डॉ. रवींद्र देसले, माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, प्रकाश चौधरी आदी उपस्थित होते.शिंदखेडा येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर १९७३ ला केशव मराठे, शेखर पाटील, बी. के. देसले ग्रुपने शर्यत घेतली होती. त्यात सुरेश भामरे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले होते.धुळे, साक्री जैताणे, चाळीसगाव, शिंदखेडा येथील बैलगाडींचा समावेश होता. सुरवातीला चिठ्ठी टाकून सहा फेरीत प्रथम एक विजेता असे सहा स्पर्धकांची अंतिम शर्यत घेण्यात आली. शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, द्वितीय पारितोषिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संदीप बेडसे तर तृतीय क्रमांक आयोजकांकडून तसेच, चौथे पारितोषिक शिवसेना जिल्हा उपसंघटक भाईदास पाटील, पाचवे पारितोषिक आत्माराम प्रधान यांच्याकडून प्रदान करण्यात आले
स्पर्धेसाठी पंच म्हणून योगेश देसले, सुरेश भामरे, प्रकाश पाटील, नाना माळी, अशोक परदेशी, गणेश खलाणे, कैलास पाटील, दत्तात्रय देसले, गजानन भामरे, यादव मराठे, कैलास वाघ यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वितेसाठी पीक संरक्षण सोसायटीचे अध्यक्ष विलास मोरे, उपाध्यक्ष श्यामकांत देसले, दिलीप पाटील, भूषण देसले, बापू चौधरी, तुकाराम चौधरी, संजय बडगुजर, मनोहर भामरे (सचिव), रावसाहेब देसले, श्रावण मराठे यांनी प्रयत्न केले. नाना चौधरी, संतोष देसले, विक्की पाटील, शुभम भामरे, मयूर भामरे यांनी संयोजन केले.द्वितीय पारितोषिक विभागलेया राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक गणेश पाटील (गोराणे ता. शिंदखेडा), द्वितीय (विभागून)- विजय माळी, जगदीश मराठे (शिंदखेडा) यांनी पटकाविले. तृतीय- संयुक्तपणे नाना चौधरी (शिंदखेडा), राजपाल पाटील (शिंदखेडा), नाना माळी (शिंदखेडा) तर उत्तेजनार्थ गोपाल पाटील (हातनूर) यांनीपटकाविले.गोराणेत मिरवणूक, जल्लोषशिंदखेडा तालुक्यातील गोराणे येथील गणेश पाटील या मालकाच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल गावातून मिरवणूक व जल्लोष करण्यात आला. सुहास कदम, पंकज कदम, पवन पाटील, कृष्णा पाटील, संजय साळुंखे, दुर्गेश पाटील, गुणवंत कदम, तान्हू फरकाटे, जगदीश साळुंखे, राहुल पाटील, ओम पाटील, भूपेंद्र पाटील, जितेंद्र कदम, शेखर पवार, सागर पवार, भागरकर पवार, बापू पाटील, बाळू फरकाटे आदींनी सहभाग घेत गावात जल्लोष केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default