रावेर येथील एकाला ऑनलाईन ट्रेडींगमध्ये गुंतवणुक केल्यास डबल नफा होईल असे अमिष दाखवून त्याची 9 लाख 30 हजारामध्ये ऑनलाईन गंडविल्याची घटना दि. 14 डिसेंबर 2022 ते दि. 1 एप्रिल 2023 दरम्यान घडली होती. फसवणुक झाल्याचे कळताच त्या इसमाने सायबर पोलिसात धाव घेत त्यांच्यासमोर हकीकत कथन केली होती. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना सायबर पोलिसांच्या पथकाने ठगाने पाठविलेले व्हाट्सअपचे मॅसेज, कॉल यासह रावेर येथील इसमाने जे ऑनलाईन ट्रेडींग अॅप्लिकेशन इंन्टॉल केले होते. त्यासह बँकेतील माहितीचे विश्लेशन करुन आरोपी निष्पन्न केला.
भावनगरातून आवळल्या मुसक्या
संशयित आरोपी गुजरात राज्यातील भावनगरातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने विजय दयाभाई कलसरीया उर्फ अजय (वय-33, रा. अम्रेली गुजरात) याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून फसवणुकीच्या रकमेतील 5 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली.
या पथकाची कामगिरी
