याबाबत विशाल प्रविण सोनवणे (वय 30 रा. प्लॉट नं. 4, सहजिवन नगर,धुळे) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अरूण भगवंतराव मदने रा.पवन नगर, महेंद्र उर्फ काळ्या माळी, पवन वाघ, राहुल उर्फे भावड्या डोलारे, देवा सोनवणे, राजेंद्र माने सर्व रा.जमनागिरी धान्य गोडावून परिसर, अजय पवार रा.फाशीपुल, मनोज पिसे, पांडूरंग पिसे दोन्ही रा.संभाप्ता कॉलनी क्रांती चौक यांनी दि.16 मे रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास शासकीय दूध डेअरी गेट समोर सहजिवन नगर येथे प्लॉट नं. 4 मध्ये अनधिकृत प्रवेश करीत अरूण मदने याने जागा आपण विकत घेतली असून घर खाली करण्यास सांगून देखील घर खाली केले नाही, असे म्हणत तुम्हाला जीव प्यारा नाही का, अशी धमकी दिली
तेव्हा फिर्यादीच्या आईने घराचे खरेदीखत आमच्याकडे असल्याचे सांगितले. त्याचा राग येवून त्यांना धक्का दिला. तसेच अजय पवार याने खिशातून बंदुक काढत धाक दाखवित घर खाली करण्यासाठी धमकविले. तर महेंद्र माळी याने दुचाकीला लावलेली तरवार काढून फिर्यादीचा भाऊ आकाश याच्या गालावर वार केले. पवन वाघ याने चाकूने आकाशच्या पायावर वार केले. तर अरून मदने यानेही लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच दोघा महिलांनाही मारहाण करण्यात आली.
