धक्कादायक! लग्नघरात घुसून नवरीलाच घातल्या गोळ्या, नंतर तरुण धावत शेजारच्या खोलीत गेला, अन्...

फुले शाहू आंबेडकर
0
देशात गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. इथे एका माथेफिरू तरुणाने थेट लग्नघरात घुसून नवरीला ठार केलं. यानंतर तरुणाने शेजारच्या खोलीत जाऊन असं काही केलं की यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे
घरात लग्नाची तयारी सुरू असताना एका माथेफिरू तरुणाने थेट घरात घुसून नवऱ्या मुलीची हत्या केली. इतकंच नाहीतर आरोपीने शेजारच्या घरात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. मृत तरुणीच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती. २१ मे रोजी तिचा विवाह होता. पण त्याआधीच असं काही घडल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत दोन मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तर पोलीस घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या हापूर परिसरात घडली आहे
नेमकं काय आहे प्रकरण?
ठाणे देहाट परिसरात राहणारे विजय प्रजापती यांच्या मुलीचं २१ मे रोजी लग्न होणार होतं. यासाठी १६ तारखेला घरामध्ये लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. घरातील सगळेजण उत्साहात आणि आनंदात लग्नाची तयारी करत होते. अशात एका माथेफिरू तरुणाने मुलीच्या घरात घुसून तिची चक्क गोळ्या झाडून हत्या केली. यावरच तो थांबला नाहीतर त्याने लगेच शेजारच्या घरात जाऊन गळफास घेत आपलंही आयुष्य संपवलं.

दरम्यान, मुलीची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर घरात एकच खळबळ उडाली आणि कुटुंबियांनी मोठी आरडाओरड सुरू केली. अशात आरोपी तरुणाने शेजारचं घर गाठलं. सगळेजण ओरडत असल्याचं पाहताच त्याने गळफास घेत आत्महत्या केली. घरातील लोक जेव्हा आरोपीला शोधण्यासाठी शिरले तेव्हा त्यांनी लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह पाहिला. तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि पुढील तपास सुरू झाला
या प्रकरणामध्ये आरोपी हा मृत तरुणीचा प्रियकर असल्याची चर्चा गावात सुरू आहे. तर पोलीस सध्या कुटुंबीय आणि शेजाऱ्यांची चौकशी करत असल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default