नेर नजीक गोरक्षकांनी उघड केली गोवंशाची अवैध वाहतूकपोलिसांनी केला सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0
तालुक्यातील नेर गावाजवळ एका पिकअप वाहनातून  होत असलेली गोवंशाची अवैध वाहतूक गोरक्षकांनी  उघड केली. या कारवाईत धुळे तालुका पोलिसांनी 1 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
एम. एच. 01/ एल.ए. 3354 या पिकअप वाहनातून गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षक ज्ञानेश्वर कचवे, ऋषिकेश पाटील, विशाल पाटील, प्रणिल मंडलिक, कुणाल घाटोळे, विक्की वाघ, सर्व रा.धुळे यांना मिळाली. त्यानुसार या गोरक्षकांनी नेर गावाच्या पुढे असलेल्या पांझरा नदीच्या पुलाजवळ पाळत ठेवली.
या रस्त्यावर संशयित वाहन येतांना गोरक्षकांना दिसले. त्यास थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने सुसाट वेगात वाहन पुढे नेले. यानंतर वाहन डिव्हायडरला धडकले.अपघातानंतर तिघे गोतस्कर अंधाराचा फायद घेवून पसार झाले. घटनास्थळी असलेल्या गोरक्षकांनी धुळे तालुका पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळावर येवून वाहनाची तपासणी केली असता या वाहनात तीन हजार रूपये किंमतीचा खिल्लारी जातीचा गोर्‍हा, 17 हजार रूपये किंमतीचे सात वासरू अत्यंत निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.
या कारवाईत एक लाख रूपये किंमतीची पिकअप वाहन, 3 हजार रूपये किंमतीचा खिल्लारी जातीचा गोर्‍हा आणि 17 हजार रूपये किंमतीचे सात वासरु असा एकूण एक लाख 20 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोकॉ. विनायक खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्य नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. बोरसे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default