शारीरिक भूक भागवायला आले अन् जाळ्यात सापडले; भिवंडीतील रेड लाईट विभागात चौघांना अटक

फुले शाहू आंबेडकर
0
भिवंडी शहर पोलिसांनी वेश्यावस्तीत सापळा रचून या चारही गुन्हेगारांना झडप घालून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा, एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस पोलीस पथकाला मिळून आले.
ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी वेश्या वस्ती भिवंडीतील हनुमान टेकडी भागात आहे. या वस्तीत सेक्स वर्कर म्हणून कार्यरत असलेल्या महिलांना सतत गुंडांकडून नाहक त्रास दिला जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. याच वेश्या वस्तीत शारीरिक भूक भागवण्यासाठी आलेल्या चार गुन्हेगारांवर झडप घालून पोलिसांनी अटक केली आहे
या गुन्हेगारांकडून पिस्तुल, गावठी कट्ट्यासह कार जप्त करण्यात आली आहे. आशिष विनोद बर्नवाल (वय २० वर्ष), मोह. जुनैद मोह. नदीम कस्सार (वय १८ वर्ष), अहमद अली हसन शा (वय २० वर्ष), अतिरुपती अजयकुमार पाणिग्रही (वय २२ वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगार चौकडीचे नावे आहेत.

वेश्या वस्तीत पोलिसांनी रचला सापळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक चारही गुन्हेगार नवी मुंबई परिसरातील दिघा गावात राहतात. रविवारी १४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चारही गुन्हेगार वासनेच्या उद्देशाने हत्यारांसह भिवंडीतील खदानरोड येथील हनुमान टेकडी भागातील वेश्यावस्तीत एका कारमधून येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.
 अनुषंगाने भिवंडी शहर पोलिसांनी वेश्यावस्तीत सापळा रचून या चारही गुन्हेगारांना झडप घालून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा, एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस पोलीस पथकाला मिळून आले.
त्यानंतर पोलीस शिपाई महेंद्र उबाळे यांच्या तक्रारीवरून भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करून त्यांच्याकडून कारसह हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहे. चारही गुन्हेगारांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर हे गुन्हेगार कुठल्या उद्देशाने हत्यारांसह आले होते, याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भामरे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default