चलनात नकली नोटा वापरल्या जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अनेक ठिकाणी नकली नोटा छपाईचा कारखाना देखील उध्वस्त करण्यात आला आहे. अशात नंदुरबार शहरात नाल्यात आढळून आलेल्या नकली नोटांच्या बंडलाने खळबळ उडाली आहे. या नोटा पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी झाली होती. तर बातमी पोलिसांपर्यंत पोहचल्यानंतर पोलिसांनी देखील याचा तपास सुरू केला आहे.
नोटा पोलिसांच्या ताब्यात
खऱ्या दिसणाऱ्या या २ हजाराच्या नोटा या ठिकाणी टाकल्या कोणी? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तरी नंदुरबार पोलिसांनी या नोटा ताब्यात घेतले आहेत. नकली नोटा ताब्यात घेतल्या असल्या तरी पोलिसांमार्फत अधिकृत अशी कोणतीही माहिती अद्यापही देण्यात आलेली नाही. नकली नोटा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली असल्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
