निवेदनात म्हटले आहे. की २८ फेब्रुवारीला पीडित शिक्षिकेला संशयित नरेंद्र अहिरराव यांनी अश्लील शिवीगाळ व मारहाण केली असून, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या गुन्ह्यात पोलिसांनी संशयितास अद्यापही अटक केलेली नाही. संशयित गावातच फिरत असून, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात पीडित शिक्षिका व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात झाल्यास वरील गुन्ह्यातील संशयित व पोलिस प्रशासन कारणीभूत राहील, याची दक्षता घ्यावी व कायदा सुव्यवस्था मालिन होऊ नये, यासाठी हे निवेदन देत असल्याचे म्हटले आहे. या वेळी रिपाइंचे जिल्हा महासचिव यशवंत बैसाणे, अमळनेर तालुकाध्यक्ष पितांबर वाघ, युवा तालुकाध्यक्ष पंकज सोनवणे, आत्माराम अहिरे, किरण बच्छाव, अजय गव्हाणे, गोपाल पवार, प्रमोद बैसाणे, प्रवीण वाघ, रमेश वाघ, अरुण वाघ, बाबुराव संदानशिव, एस. एन. खैरनार, अ. ना. घोलप, एन. आर. मैराळे, घनश्याम घोलप, तानाजी वाघ आदींनी आंदोलन केले
शिक्षिकेस अश्लील शिवीगाळप्रकरणी रास्तारोको; अमळनेरमधील घटना
बुधवार, मे १०, २०२३
0
पीडित दलित शिक्षिकेस अश्लील शिवीगाळ करणाऱ्या संशयित आरोपीस तत्काळ अटक करून न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे (रिपाइं) सोमवारी (ता. ८) महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रभारी तहसीलदार अमोल पाटील व सहायक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांना निवेदन देण्यात आल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले
Tags
