येवला येथे डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद

फुले शाहू आंबेडकर
0
एसटी बससह इतर वाहनांतील डिझेल चोरी करणार्‍या टोळीच्या येवला तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर जिल्हातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची माहिती येवला तालुका पोलिसांनी दिली.
राजापूर येथील एस. टी. बसमधील डिझेल चोरीचे गुन्हे दाखल होते. जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी केलेल्या सूचनांनुसार येवला तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत, सहा. पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पो. हवा. माधव सानप, ज्ञानेश्वर हेंबाडे, राजेंद्र केदारे, सचिन वैरागर, ज्ञानेश्वर पल्हाळ, संतोष जाधव, सागर बनकर, आबा पिसाळ यांच्या पथकाची स्थापना करण्यात आली.
पोलीस पथकाने घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करून तसेच एस. टी. बस पार्किंगचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीचे करून विश्लेषण करून माहिती मिळवून गुन्ह्याचा मास्टर माईंड अमोल भाऊसाहेब कोटमे (26) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास करून त्याचे साथीदार विजय गणपत जाधव (37), शुभम संदीप गायकवाड, राजेंद्र ऊर्फ बंडू अशोक कोटमे यांना ताब्यात घेतले. पकडलेल्या चोरट्यांनी राजापूर (ता. येवला, जि. नाशिक) येथे बसमधील डिझेल चोरी केल्याची कबुली दिली आहे. लूटमार करणार्‍यांपैकी एक साथीदार फरार आहे. गुन्हेगारांकडून डिझेल चोरीसाठी वापरण्यात येणारी पांढर्‍या रंगाची मारुती स्विप्ट, चोरी केलेले डिझेल व डिझेल चोरीचे साहित्य जप्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default