शिरपुर- येथील निमझरी नाका येथे नरवीर शिवाजी काशिद यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपुर- येथील निमझरी नाका येथे नरवीर शिवाजी काशिद यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
     हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत छत्रपती शिवाजी महारांजानी बारा बलुतेदार व अठरा अलुतेदारांना घेऊन स्वराज्य उभे केले.पन्हाळगडाचा वेढा सर्वांना माहितच आहे या प्रसंगी पन्हाळगडाला सिध्दीजौहरने वेढा दिला होता तेथुन निघणे कठीण झाले होते संपुर्ण रसद संपली होती.अशा प्रसंगी छत्रपतीचे जिव वाचवणे म्हत्वाचे होते, नाभिक समाजातील मावळे शिवाजी काशिद हे हुबेहुब छत्रपती सारखे दिसायचे,महारांजानी योजना आखली प्रति शिवाजी म्हणुन शिवाजी काशिद मार्फत चकमा द्यायचा व आपण विशालगडाकडे निघायचे,तेव्हा साक्षात मृत्यू समोर असताना लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणुन स्वराज्यासाठी नाभिकपुत्र शिवाजी काशिंदांनी प्रति शिवाजी महाराज म्हणुन आपल्यावर सोपवलेली कामगीरी फत्ते केली.अखेर सिध्दीजौहर च्या लक्षात आले व प्रति शिवाजी असलेले शिवाजी काशिदांवर वार केले.बलिदान झाले,तेव्हा मरताना शिवाजी काशिद बोलले मी शिवा काशिद म्हणुन जरी जन्माला आलो पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणुन मरतोय म्हणुन या देहाचा मला सार्थ अभिमान आहे.अशा नरवीर शिवाजी काशिदांना अखिल भारतीय जिवा सेना तर्फे प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले.
     याप्रसंगी अखिल भारतीय जिवा सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले,युवक प्रदेश सचिव,प्रा.नरेंद्र महाले सर,नाभिक हितवर्धक संस्थेचे जिल्हा अध्यक्ष जगदिश सोनगरे,जिवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष,ओंकार ईशी,जिल्हा प्रवक्ते कुंदन महाले,नाभिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नंदू वारूडे,जिवा सेनेचे सल्लागार चिंतामण शिरसाठ,गणेश अहिरराव,शहराध्यक्ष चेतन शिरसाठ,भुराभाऊ सैंदाणे,महेश ईशी,सागर ठाकरे,भद्रा वारूडे,विजय पवार,कविश्वर ईशी,दिपक सैंदाणे,ज्ञानेश्वर सैंदाणे, आदी नाभिक पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default