जुने लोंढरेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार

फुले शाहू आंबेडकर
0
जुने लोंढरे येथे राहणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातील करन नाना कोळी (वय 23) फुस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल होता. त्यादरम्यान करन कोळी याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असे जबाब पिडीतेने दिला आहे. त्यानुसार या गुन्ह्यात भादंवि कलम 376 (2) (जे) (एन), पोस्कोसह अनु.जाती जमाती अधिनियमचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे हे करीत आहे
तसेच दुसर्‍या एका घटनेत विटाई (ता. शिंदखेडा) येथे 33 वर्षीय मजुरी काम करणार्‍या महिलेवर गावातील भटू काशिनाथ खैरनार (वय 37) याने बलात्कार केला. दि. 4 मे रोजी दुपारी एक ते दीड वाजेदरम्यान पिडीत महिला ही घरात एकटी होती. तेव्हा भटू हा याने घरात घुसून जबरीने तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

कोणास काही सांगितले तर तिला जिवे मारण्याचीही धमकी दिली. याबाबत पिडीतेने आज नरडाणा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून भटू खैरनार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रामनाथ दिवे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default