पालघरच्या बोईसरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. याप्रकरणी पीडित तरुणीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. मेहुण्याने आपल्याच मेहुणीचं लैंगिक शोषण केल्याचं समोर येताच परिसरातील नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण लग्नाचं आमिष दाखवून बायकोच्या सख्या लहान बहिणीचं मागील दोन वर्षांपासून लैंगिक शोषण करत होता. तसंच काही दिवसांपूर्वी याच आरोपीने स्वतःच्या चार वर्षीय चिमुकल्या मुली सोबत देखील अश्लील चाळे केले होते. हा प्रकार उघड होताच, पत्नीने पतीविरोधात पोलिसांत धाव घेतली.
पत्नीने दिलेल्या फिर्यादीनंतर आरोपी विरोधात पॉक्सोसह विविध कलमान्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या घटनेनंतर बोईसर परिसरात नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात असून आरोपीला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे . मागील आठवडाभरापासून बोईसर पोलीस ठाण्या अंतर्गत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामध्ये बोईसर पोलिसांना गुन्हेगारांवर आळा बसवण्यात अपयश येत असल्याचं वारंवार समोर येत आहे
