ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना अंधारे यांनी कर्नाटक निवडणुकीवरून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. अंधारे म्हणाल्या, 'महाविकास आघाडीसाठी शुभ संकेत आहे. कर्नाटकचे निकाल हे एकूणच देशभरामध्ये 'मोदी है तो मुनकीन है' असे म्हणनारे लोक होते. त्या सर्व भक्तांसाठी चपराक आहे'.
सर्वांसाठी हा ऊर्जादायी निकाल आहे. पंतप्रधान मोदी यांनी प्रचंड नकारात्मक राजकारण, ऊर्जा केली होती. त्याला सर्व कंटाळले आहेत. कर्नाटकमधील निकालाची विजयाची ऊर्जा ही महाराष्ट्रात दिसेल, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.
' राहुल गांधींना भाजपच्या स्लीपर सेलने पप्पू म्हणून हिणवलं. तेच राहुल गांधी हे सर्वांचे बाप निघाले. राहुल गांधी यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आणि राहुल गांधींच काय तर जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पप्पू पास नही हो गया, पप्पू मेरिट में आ गया, अंधारे पुढे म्हणाल्या.
