नाशिक हादरलं; विवाहित महिलेची सामूहिक अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिक: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना इगतपुरी तालुक्यातील खंबाळेमध्ये घडली आहे.
पोलिसांकडून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले असून घोटी पोलीस ठाण्याबाहेर गावकऱ्यांचा मोठा जमाव झाला आहे
मात्र घटनास्थळी पोलीस उशीरा पोहोचल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. महिलेचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका संतप्त गावकऱ्यांनी घेतली आहे. यामुळे घोटी पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घोटी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहे. गावकऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default