मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी महिलेचा प्रियकर पती आणि अल्पवयीन मुलगी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. दीड वर्षापूर्वी महिलेने ज्या प्रियकरासोबत दुसरे लग्न केले होते, त्याला अल्पवयीन मुलीसोबतही प्रेम झाले. एवढेच नाही तर त्यांच्यात संबंधही निर्माण झाले. हा प्रकार आईला कळताच तिने पतीविरुद्ध महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
शहरातील तिली भागात राहणाऱ्या एका 37 वर्षीय महिलेने तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाशी पुन्हा लग्न केले. ही घटस्फोटित महिला तीली परिसरात खासगी नोकरी करायची. तेव्हाच तिची सहकारी विक्रम कुमारशी मैत्री झाली. या मैत्रीचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. जवळपास एक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केले.
महिलेला दोन मुली असून एक 15-16 वर्षांची आणि दुसरी 12 वर्षांची आहे. जवळपास दीड वर्ष सर्व काही सुरळीत चालले होते. पण काही दिवसांपूर्वी या महिलेला समजले की, तिची मोठी मुलगी आपल्या तरुण पतीवर प्रेम करू लागली आहे. दोघांमध्ये अनैतिक संबंधही झाले आहेत. महिलेने दोघांनाही समजावले, पण पती किंवा मुलीने दोघांनीही या महिलेचे ऐकले नाही.
गुरुवारी रात्री उशिरा आई आणि मुलीमध्ये विक्रमसोबतच्या संबंधांवरुन कडाक्याचे भांडण झाले. सिव्हिल लाईन चौकात दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. मात्र, लोकांनी बोलल्यानंतर आई आणि मुलगी दोघी महिला पोलीस ठाण्यात आल्या. आईने आरोप केला आहे की, तिचा पती या अल्पवयीन मुलीला फसवत आहे. त्याचे तिच्याशी अनैतिक संबंध आहेत. त्यामुळे त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर येथे मुलीने अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे नाकारले आहे.
पोलिसांनी मुलीची मानसिक (मनोवैज्ञानिक) पद्धतीने चौकशी केली असता तिने आईने केलेले काही आरोप मान्य केले. त्यानंतर आईच्या तक्रारीवरुन तिच्या दुसऱ्या पतीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सध्या फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे, असेही तिने सांगितले.
