मिळालेल्या माहितीनुसार, सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नारायणगव्हाण या ठिकाणी गुरुवारी रात्री एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. संतोष गायकवाड असं हत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. डोक्यामध्ये कुऱ्हाड घालून संतोष यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी संतोष गायकवाड यांची पत्नी सुरेखा गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हत्या झालेले संतोष गायकवाड यांच्या मुलीवर सिद्धांत भगवान दरेकर या तरुणाचे एकतर्फी प्रेम होते. या प्रेमातून गायकवाड आणि दरेकर कटुंबामध्ये वाद झाले होते. संतोष यांच्या मुलीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सिद्धांत दरेकरने गळाफास लावून आत्महत्या केली होती. तेव्हापासून दरेकर कुटुंब आणि गायकवाड कुटुंबात नेहमीच वाद होत होते
याच कारणातून गुरुवारी रात्रीच्या सुमारास दरेकर कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलांनी संतोष गायकवाड यांची हत्या केली. या तिन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिन्ही अल्पवयीन मुलांसह खून करण्यास भाग पाडणाऱ्या भगवान नाना दरेकर, अजिंक्यतारा विष्णू दरेकर, विष्णु नाना दरेकर, नारायण नाना दरेकर, सोमनाथ नारायण दरेकर, हनुमंत नारायण दरेकर यांच्याविरोधात सूपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही मुलांमागे त्यांच्या कुटुंबातील सदस्य मास्टर माईंड असल्याने आरोपींना अटक करावी, अशी मागणी संतोष गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
