नंदुरबार आरटीओ कार्यालयातून रेतीचा डंपर गायब

फुले शाहू आंबेडकर
0
येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर जप्त करून ठेवलेला 5 ब्रास रेतीने भरलेला डंपर चोरून नेल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील आर.टी.ओ कार्यालयासमोर वाळूचा डंपर (क्र.डी डी-1-एल 9373) जप्त करून उभा करण्यात आला होता. या डंपरमध्ये 25 हजार रुपये किमतीची 5 ब्रास वाळू होती. दरम्यान, दि.22 ते 23 जूनदरम्यान सदर उभा डंपर शेख कय्युम शेख असलम याने सदर उभा डंपर चोरून नेला. डंपर सह 10 लाख 25 हजाराचा मुद्देमाल चोरून नेण्यात आळल आहे. याबाबत तलाठी महेश दत्तात्रय गावित यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास असलेला वाळूचा हवालदार राजेश येवले करीत आहेत.
दरम्यान, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर अनेक वाहने जप्त करण्यात आली आहे. अनेक वाहनांमध्ये अशाप्रकारे रेतीचा मुद्देमाल असतो. त्यातून अनेकवेळा मुद्देमाल चोरुन नेण्यात येतो. त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default