तरुणीची गळफास घेवून आत्महत्या ; मृतदेह बघून वडीलांना बसला धक्का

फुले शाहू आंबेडकर
0
आई आणि भाऊ बाहेरगावी तर वडील कामाला गेले असल्याने घरात कोणीच नसतांना कोमल वसंत भावसार (वय-30, रा. रौनक कॉलनी, अयोध्यानगर) या तरुणीने घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. तरुणीचे वडील घरी आल्यानंतर त्यांना मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांना धक्का बसला. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील अयोध्या नगरातील रौनक कॉलनीत कोमल भावसार ही तरुणी वास्तव्यास असून ती बँकेत अकाऊंटन म्हणून नोकरीला होती. तरुणीची आई आणि भाऊ पुण्याला गेले होते तर वडील वर्कशॉपमध्ये कामाला गेले असल्याने ती घरी एकटीच होती. दुपारच्या सुमारास कोमल भावसार हीने राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळी तीचे वडील कामावरुन घरी परतले असता, त्यांना आपली मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. मुलीचा मृतदेह बघताच त्यांनी मनहेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default