शिरसेाली (ता. जळगाव) येथील रहिवसी बी. एस. सोनार यांच्या मोबाईलवर दुपारी चार वाजता अज्ञाताचा फोन आला. त्याने मराठीत संभाषण करत आम्ही बँकेतून बोलत असून क्रेडीटकार्ड लिमीट वाढवण्याचे सांगत सोनार यांच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला. आलेला ओटीपी सांगितल्यावर बँक खात्यातून काही क्षणातच ३४ हजार ५८० रुपये परस्पर डेबीट झाल्याचे निदर्षनास आले.
तत्काळ सोनार यांनी सायबर पोलिस ठाण्यात संपर्क करुन तक्रार दिली. सायबर तज्ञांनी याप्रकरणी वायुगतीने पावले उचलत पे-टीएम या साईटवरुन होणारा हा व्यवहार थांबवण्या संदर्भात संबधीत कंपनीला सुचीत केले असून सोनार यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार जितेंद्र राठोड करत आहेत.
