सायगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचारमेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0
तालुक्यातील सायगाव येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्यावर मनाविरूध्द अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील सायगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे काकाजी राजेंद्र सोळसे रा.सायगाव याच्याशी मार्च २०२३ मध्ये लग्न लावले. पिडीत मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील तिच्या मनाविरुद्ध जाऊन अत्याचार केला. त्यानंतर पिडीत मुलगी ही माहेरी निघून गेली. त्यानंतर तिचे पतीसह सासरचे मंडळी तिला घेण्यासाठी आले. त्यावेळी तिने जाण्यास नकार दिला. परंतू मुलीला नांदवण्यास पाठवा नाहीतर लग्नात लागलेले तीन लाख रूपये आम्हाला परत द्या. अशी धमकी वजा दम करत मारहाण केली. अखेर पिडीत मुलीने मेहुणबारे पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार काकू मिरा दिलीप लोखंडे, काका दिलीप बाबुराव लोखंडे, मावसभाऊ रविंद्र दिलीप लोखंडे, मावस बहिण मनिषा ज्ञानेश्वर वाघ, मावस भाऊ धिरज दिलीप लोखंडे सर्व रा. कळवण, मावशी कल्पना राजू वाघ रा. सटाना, पती काकाजी राजेंद्र सोळसे, सासू लताबाई राजेंद्र सोळसे, सासरे राजेंद्र तुकाराम सोळसे, जेठ योगेश राजेंद्र सोळसे, जेठ ज्ञानेश्वर राजेंद्र सोळसे सर्व रा. सायगाव ता. चाळीसगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default