याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईकडे येणाऱ्या पंजाबमेल एक्सप्रेस ही ट्रेन भुसावळ आऊट यार्डवर थांबली होती. ही संधी साधत तीन जण एक्सप्रेसमध्ये चढले. त्यांनी डब्यातील काही प्रवाशाना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी दमदाटी करत सात प्रवाशांकडून मोबाईल आणि रोकड हिसकावून घेत तेथून पळ काढला.
या घटनेमुळे प्रवासी घाबरले होते. नाशिक रेल्वे स्थानक गेल्यानंतर त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना ही घटना सांगितली. या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भुसावळ रेल्वे पोलिसांकडे वर्ग करणार असल्याची माहित कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
