ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (57, पद- उपविभागीय अभियंता, बांधकाम उपविभाग चाळीसगाव, वर्ग-1, ता.चाळीसगाव , जिल्हा- जळगाव. रा. अशोक नगर, धुळे जि. धुळे) असे लाचखोर अधिकार्याचे नाव आहे.तक्रारदार हे ठेकेदार असून, तयांनी डॉ . शामा प्रसाद मुखर्जी रुरबन' या शासकीय योजनेचा माध्यमातून पातोंडा (ता.चाळीसगाव ) येथे जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागातून समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते.सदर कामाची 4 कोटी 82 लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम 35 लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात लाचखोर विसपुते याने 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी शनिवारी (ता 16) केली. तडजोडीअंती 4 लाख देण्याचे ठरले.याप्रकरणी तक्रारदार ठेकेदारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणी केल्यानंतर पथकाने सापळा रचला. लाचखोर विसपुते याने शहरातील गडकरी चौक परिसरात 4 लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. त्यावेळी दबा धरून असलेल्या पथकाने विसपुते यास रंगेहाथ अटक केली
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत, प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे , अविनाश पवार, सुरेश चव्हाण यांनी केली.मोठी कारवाई पण अपर अधीक्षक 'डिस्टर्ब'बांधकाम उपविभागीय अभियंत्याला 4 लाखांची लाच घेताना अटक केल्याची कारवाई रात्री उशीरा झाली. त्यामुळे याबाबत अधिकार्याकडे माहितीसाठी संपर्क साधला जात असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर अधीक्षक मात्र नाराज झाले. 'इतक्या उशिरा विचारता का' असे म्हणत चांगलेच डिस्टर्ब झाले.मुळात पोलीस दलात काम करताना कर्तव्यदक्षता बाळगणे आवश्यक असते. मात्र अपर अधीक्षक डिस्टर्ब का झाले असावेत. जेथे त्या विभागाच्या प्रमुख या कोणत्याही वेळी कारवाईसाठीही आणि माहिती देण्यासाठीही तत्पर असताना अप्पर अधीक्षकांचे हे वागणे खटकणारे होते.
