डॉ.अरविंद झेंडे समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

फुले शाहू आंबेडकर
0
डॉ.अरविंद झेंडे समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.

प्रतिनिधी : ( काळे किशोर) दि.१७, पुणे : पंढरीच्या पांडुरंगा्वर अपार श्रद्धा असणारे पुण्यातील ख्यातनाम आयुर्वेदाचार्य डॉ.अरविंद झेंडे हे वारकरी संप्रदायातील थोर क्रांतिकारी संत आणि सकल नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री.सेना महाराज यांची ते निस्सीम भक्त.गेली अनेक वर्ष आपल्या समाजकार्यातून समाजाला सेना महाराजांची शिकवण आचरणात आणण्याचे आवाहन करीत ते वेळोवेळी विविध कार्यक्रमातून करीत असतात.
कात्रज मधील संतोषीमाता नगर येथील त्यांच्या क्लिनिक मधे समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांसाठी दर एकादशीला मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते.या शिबिरात सर्व प्रकारच्या दुर्धर आजारांरील तपासण्या करून उपचार केले जातात आणि गरजेप्रमाणे रुग्णांना मोफत औषधोपचार देखील केला जातो.डॉ.झेंडे यांचे समाजसेवेचे हे अविरत व्रत गेली कित्तेक वर्ष अखंडपणे सुरूच आहे.
अनाथ आश्रमातील मुलांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे महान कार्य देखील त्यांचे सुरूच आहे.समाजबांधवांना वेगवेगळ्या व्याधींवर निःशुल्क सल्ला आणि योग्य मार्गदर्शन ते नेहमीच करीत असतात. नाभिक समाजातील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक आणि आरोग्यविषयक तथा रोजगाराबाबतचे मार्गदर्शन देखील त्यांचे सुरूच असते.
अशा प्रकारे अखंडपणे समाजकार्याला वाहून घेतलेल्या या महान कर्मयोगाग्याचा सन्मान नुकताच पुणे कात्रज येथे संपन्न झाला.
पुण्यातील श्री संत सेना महाराज नाभिक एकता संघ यांनी त्यांच्या आजवरच्या या भीमकायरूपी समाजकार्याची दखल घेत त्यांचा समजभूषण या सर्वोच्य पुरस्काराने सन्मान करून आदराने गौरविण्यात आले आहे. पद्मावती येथील विणकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यात डॉ.झेंडे यांच्या आजवरच्या समाजकार्याचा गौरव करताना हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायाधीश मोहन क्षीरसागर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर जेष्ठ समाजसेवक आणि राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे प्रदेश सल्लागार अरुणभाऊ कालेकर,परमेश्वर सोनवणे,भिकन वाघ,समाधान निकम,प्रशांत राऊत,मनोज अहीरराव,सुनंदा सुर्वे, सुवर्णा सुर्वे यांच्यासह नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी जेष्ठ समाजसेवक
रामदास सैंदाने यांचा देखील समाज भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पांडुरंगाच्या आणि श्री संत सेना महाराज यांचे प्रतिमा पूजन करून पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
हभप सुरेश महाराज दरवडे यांनी सेना महाराज यांच्या वारकरी संप्रदायातील योगदानाबद्दल मंत्रमुग्ध करणारे प्रवचन यावेळी सादर केले.
याच कार्यक्रमात महिलांच्या आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी या विषयाबाबत डॉ.योगिता सूर्यवंशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.तसेच या दरम्यान डॉ.झेंडे आणि समाजसेवक रामदास सैदाने यांनी उपस्थितांना सोहम आणि आरोग्यविषयक विषयांवर प्रात्यक्षिक सादर केले.
समाजातील दहावी आणि बारावी परीक्षा उतिर्न झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव देखील याच कार्यक्रमाच्या दरम्यान करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास बोरसे आणि केले तर सुनील पगारे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default