त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सापळा लावला आणि ताब्यात घेतले. दरम्यान, तक्रारदारास दोन लाखाची मागणी करून एक लाख देण्यावर तडजोड केल्याप्रकरणी फौजदार रजपुत याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी (ता. 1) दुपारी पोलिस उपनिरीक्षक रजपूत यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे
एक लाखाची लाच भोवली; फौजदार रजपूत 'लाचलुचपत'च्या ताब्यात
शनिवार, डिसेंबर ०२, २०२३
0
पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे दोन लाखांची लाच मागणी करून एक लाखावर तडजोड केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील फौजदार विक्रमसिंह रजपूत याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे रजपूत यांच्याबद्दल एक तक्रार आली होती. एका गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी फौजदार रजपूत याने दोन लाखांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार होती.
Tags
