पवन नगर येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानक बंदुकीतून गोळी सुटल्याच्या आवाजाने परिसरात घबराट पसरली होती. या परिसरात घटनेची जोरदार चर्चा हाेती. ही घटना पाेलिसांपर्यंत पाेहचली. परंतु यामध्ये काेणीही तक्रारदार समाेर येत नव्हता.
अखेरीस पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. पोलिसांनी एका सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला. त्यामध्ये एक टोळके आढळले. त्यातील रोहित माले या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने समोरील व्यक्तीस जीवे मारण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याचे दिसून येत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
