१७ वर्षीय मुलीला घरी कपडे धुण्यासाठी बोलवून केला बलात्कार, हांडेवाडी परिसरातील घटना

फुले शाहू आंबेडकर
0
लोणी काळभोर परिसरातील एका अल्पवयीन मुलीला कपडे धुण्यासाठी बोलवून घेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे...
दिवसेंदिवस शहरात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. यात प्रामुख्याने अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार त्यांचे जवळचे नातेवाईक किंवा शेजारी यांच्याकडून होत असल्याचे देखील समोर आले आहे. लोणी काळभोर परिसरातील एका अल्पवयीन मुलीला कपडे धुण्यासाठी बोलवून घेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी १७ वर्षीय पीडितेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सुदर्शन शेरमाळे (मुळ रा. मनमाड जि. नाशिक सध्या रा. हांडेवाडी ता. हवेली) याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर महिन्यात तीन वेगवेगळ्या दिवशी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुळचा नाशिक जिल्ह्यातील असून हांडेवाडी येथे रूम भाड्याने घेऊन राहतो. नोव्हेंबर महिन्यात आरोपीने पीडित मुलीला कपडे धुण्याच्या बहाण्याने रूमवर बोलवून घेतले. यानंतर त्याने पीडित मुलीला जबरदस्तीने पकडून तिच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच तीन वेगवेगळ्या दिवशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र खैरनार करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default