तेजस रवींद्र ईशी (चौधरी) असे मृत युवकाचे नाव असून, त्याचा २७ ते २८ ऑक्टोबर २०२२ दरम्यान इगतपुरी (जि. नाशिक) येथील मँगो व्हिला रिसॉर्टमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने तेजसचे वडील तथा येथील कृषी विभागातील अनुरेखक रवींद्र जगन्नाथ चौधरी यांनी इगतपुरी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशावरून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मित्राशी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी संशयितांनी हे कृत्य केल्याचा संशय चौधरी यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. तेजसचा मित्र ऋतिक जैन याचा २७ ऑक्टोबरला वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी तेजस व त्याचे मित्र मँगो व्हिला रिसॉर्टमध्ये गेले होते.
२८ ऑक्टोबरला केतन भंडारी याने तेजसचे काका डॉ. सुनील चौधरी यांना फोन करून तेजसचा अपघात झाला असून, प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगितले.
तेथील डॉक्टरांशी बोलल्यावर रुग्णालयात नेण्यापूर्वीच तेजसचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तेजसच्या नातलगांनी नाशिक येथे जाऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. तेजसच्या मृत्यूबाबत त्याच्यासोबत गेलेले मित्र उडवाउडवीची उत्तरे देत होते.
गोळ्या दिल्याचा संशय
दरम्यान, डॉ. सुनील चौधरी यांनी केतन भंडारी याचा फोन तपासला असता त्याने एकाला चार वेगवेगळ्या प्रकारच्या दहा अशा एकूण ४० गोळ्या आणण्याचा संदेश पाठविल्याचे आढळले. तेजस आणि केतन भंडारी यांचे २०२२ मध्ये गणेशोत्सवादरम्यान भांडण झाले होते.
त्याचा वचपा काढण्यासाठी संशयितांनी वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्त करून मँगो व्हिला रिसॉर्टमध्ये नेऊन मद्यात प्राणघातक पदार्थ मिसळून त्याचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हे आहेत संशयित
